लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती निमित्य युवक कॉग्रेस व्दारे वृक्षरोपन
कन्हान,ता.०१ ऑगस्ट
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य नागपुर जिल्हा ग्रामिण व रामटेक विधानसभा युवक कॉग्रेस व्दारे कांद्री, कन्हान, पारशिवनी, रामटेक येथे वृक्षरोपन करून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.

मंगळवार (दि.१) ऑगस्ट ला लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ वी जयंती निमित्य रामटेक विधानसभा अंतर्गत प्रमुख शहरात नागपुर जिल्हा ग्रामिण युवक कॉग्रेस सचिव रोहित बर्वे व रामटेक विधानसभा युवक कॉग्रेस अध्यक्ष निखिल दा. पाटील, युवा नेते अजय कापसिकर यांच्या नेतुत्वात सर्व प्रथम संताजी नगर कांद्री येथील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार व मानवंदना अर्पण करून वृक्षरोपन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.






