महामार्ग पोलिसांनी वाचविले चिमुकल्यासह चौघांचे प्राण
कन्हान,ता.०३ ऑगस्ट
नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरिल अण्णा मोड डुमरी जवळ ट्रक चालकाने आपले वाहन विरूध्द दिशेने व निष्काळजीपणे चालवुन रूग्णवाहिकेला सामोरासामोर धडक दिल्याने भर पावसात झालेल्या अपघातात रूग्णवाहिका चालक, नर्स, प्रसुत महिला व तिचे दहा दिवसांचे बाळ जख्मी अवस्थेत रूग्णवाहिकेत अडकलेल्यांने महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकल्यासह चार लोकांचे प्राण वाचवुन खोळबंलेला महामार्ग सुरळित केला.





