श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी साजरी
कन्हान, ता.२१
श्री संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी श्री संत गजानन महाराज मंदीर कन्हान व कांद्री येथे भाविक भक्तांनी विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.

बधवार (दि.२०) सप्टेंबर ला श्री संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथि निमित्य कन्हान शहरातील पांधन रोड, तिवाडे ले-आऊट श्री हनुमान आणि श्री संत गजानन महाराज मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी गजानन महाराजांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुजन करून अभिवादन केले. महिलांनी व नागरिकांनी भजन, कीर्तन, दहीकाल्याचा कार्यक्रम करित परिसरातील भाविकांना प्रसाद वितरण करुन पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
कांद्री ला गजानन महाराज पुण्यतिथी साजरी
कांद्री येथील स्वर्गीय सोमाजी गिऱ्हे यांचा शेतातील श्री संत गजानन महाराज मंदीरात पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.





