Home Breaking News कोळसा माफिया भुजंग महल्ले सहा महिने जिल्हा हद्दपार

कोळसा माफिया भुजंग महल्ले सहा महिने जिल्हा हद्दपार

10

कोळसा माफिया भुजंग महल्ले सहा महिने जिल्हा हद्दपार

कन्हान,ता.२१

   पोलीस स्टेशन हद्दीतील टेकाडी येथिल कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार भुजंग महल्ले याला उपविभागिय अधिकारी रामटेक यांचे आदेशाने नागपुर जिल्हयातुन सहा महिन्याकरिता हद्दापार कऱण्यात आले आहे.

  टेकाडी गावात राहणारा कोळसा माफीया व सराईत गुन्हेगार भुजंग जनार्धन महल्ले याचा गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याच्या उद्देशाने व परिसरातील नागरिकांचे मनात त्याचे विरुद्ध निर्माण झालेले दहशतीचे प्रभाव संपविण्याचा उद्देशाने त्याचे विरुद्ध कन्हान पोलीसांकडुन कलम ५६ (१) (ब) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये ईस्तगाशा तयार करुन वरिष्ठ पोलीस अधिकारी मार्फतीने उपविभागीय अधिकारी रामटेक यांच्याकडे पाठविण्यात आले होते. सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी रामटेक यांनी सुनावनी अखेर सदर भुंजग नागपुर ग्रामिण जिल्हयातुन सहा महीन्यासाठी हद्दपार केल्याचे आदेश पारित केले. आदेश तामिल करून त्याला त्याच्या नाते वाईकांकडे तुमसर जिल्हा भंडारा येथे पाठविण्यात आले आहे. सदर कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण हर्ष ए.पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांच्या मार्गदशनात वरिष्ठ पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, सपोनि चेतनसिंह चौहाण, पो.हवा जमाल मुदस्सर, हरिष सोनभद्रे, पोना अमोल नागरे, अनिल यादव, पो शि अश्विन गजभिये, आकाश सिरसाट, नवीन पाटील यांनी पार पाडली.