शिवसेना (उबाठा) पक्ष व नागरिकांनी जुन्या कन्हान नदी पुलावर स्वच्छता
कन्हान : – श्री गणेशोत्सवा निमित्य कन्हान, सत्रापुर व लेबर कँम्प च्या नागरिकांनी शिवसेना उध्दव बाळा साहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या सहकार्याने स्वयंफुर्त श्रमदान करून जुन्या कन्हान नदी पुलावर स्वच्छता अभियान राबवुन साफ सफाई करून स्वच्छता केली.

ब्रिटिश काळीन पुरातन १५० वर्ष सेवा देणाऱ्या कन्हान नदीच्या जुन्या पुलावर मोठ्या प्रमाणात गवत, झाडी, कचरा वाढल्याने पुलाची दैनाअवस्था झाली होती. रोज सकाळी फिरण्याकरिता येणाऱ्या नागरिकांना तसेच दिवसा व रात्र अंत्यविधी करिता पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना वाढलेल्या झाडी, गवतामुळे नेहमी विषारी जनावर आणि झाडी झुडपी मुळे येण्या जाण्या-यास त्रास होत होता. याकडे शासन, प्रशानाचे होत असलेले दुर्लक्षतेला वाचा फोडण्या करिता कन्हान सत्रापुर व लेबर कॅम्प प्रभाग क्र ८ च्या नगरसेविका मोनिकाताई पौनीकर यांनी दिलेल्या नगरपरिषदेच्या दोन कर्मचा-यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी स्वयंफुर्त श्रमदान करित संपुर्ण जुन्या कन्हान नदी पुलावर वाढलेले गवत , झाडी, झुडपी व कचरा काढुन पुलाची स्वच्छता करण्यात आली.





