किरकोळ वादातून भरदिवसा घरात घुसून तरुणाची हत्या
कन्हान, ता.०३
कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील खदान नंबर ६ इंदर काॅलरी पाण्याच्या टंकी जवळ किरकोळ वादातून भरदिवसा घरात घुसून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली असुन नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवार (दि.२) ऑक्टोबर दुपारच्या दरम्यान आरोपी आकाश राजभर (वय १९) रा.खदान नंबर सहा व मृतक सुनील चुन्नुलाल केवट (वय २०) रा.खदान नंबर सहा, कन्हान यांचात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. दुपारी २ वाजता बहीण संगीता सुशील केवट घरी कपडे धुत होती तर वडील चुन्नूलाल घरी जेवण करत असताना सुनील बाहेरून येऊन खोलीत झोपला. पाठोपाठ आकाश त्याची आई- वडील घरी आले. आकाश ने संगीता ला सुनील कुठे आहे ? असे विचारले असता, माहित नसल्याचे सांगितले. आकाश ने खिशातून चाकू काढून पाहण्यासाठी घरातील खोलीत गेला. खोलीत आकाश ने सुनिल ला मारहाण करण्यास सुरुवात केली असता आवाज ऐकून संगीता, वडील चुन्नूलाल आणि आकाश राजभर चे आई वडील हे चौघेजण खोलीच्या दिशेने धावले. आकाश ला सुनील पासून वेगळे करण्यास सुरुवात केली. यावेळी आकाश याने सुनील चा छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले . संगीता ने पती सुशील व शेजाऱ्यांच्या मदतीने सुनीलला कामठी येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासुण त्याला मृत घोषित केले.





