नवरात्रीचा उत्साह शिगेला: कार्यक्रमांची रेलचेल
कन्हान गरबा महोत्सवात आनंदाला उधाण
कन्हान,ता.२१
कन्हान येथील गरबा महोत्सवात शेकडो प्रेक्षक स्पर्धकांच्या नृत्याचा आनंद घेत आहेत. कानपूर केमिकलच्या विशाल मैदानावर सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी माता राणीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून गरब्याला सुरुवात झाली.






