Home Breaking News भरदिवसा टेकाडी येथे पत्नीची निघृण हत्या

भरदिवसा टेकाडी येथे पत्नीची निघृण हत्या

12

भरदिवसा टेकाडी येथे पत्नीची निघृण हत्या

कन्हान,ता.३१

   कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील महाजन नगर, टेकाडी येथे भरदिवसा पती ने पत्नीचा गळ्यावर चाकु ने वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

   पोलिसांच्या माहिती नुसार, महाजन नगर, वेकोली, टेकाडी येथील रहिवासी आरोपी अमित नारायण भोयर (वय २८) याचा कामठी येथील दुलेश्वरी रामकृष्ण देवगडे (वय २५) हिच्यासोबत २०२२ मध्ये प्रेम विवाह झाला होता. लग्नाच्या काही महिन्या नंतर दोघां मध्ये भांडणे सुरू झाली. नेहमीच्या भांडणाला कंटाळून आरोपी अमित भोयर याने आज मंगळवार (दि.३१) ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वाजता च्या दरम्यान घरात असलेल्या चाकू ने पत्नीच्या गळ्यावर सपासप वार करून तिची निघृण हत्या केली.

   स्वतः कन्हान पोलीस स्टेशन ला जाऊन आत्मसमर्पण केले. घटनेची माहिती कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांना मिळताच त्यांनी पोलीस कर्मचारी सोबत घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले.

  सदर घटना गंभीर्याने घेत नागपुर ग्रामीण अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.संदीप पखाले यांनी घटनास्थळी भेट देऊन उचित कार्यवाहीचे निर्देश दिले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते करीत आहे .