स्व.बळीराम दखने यांना वाहिली श्रद्धांजली
कन्हान, ता.११ जानेवारी
बळीराम दखने हायस्कुल आणि विकास प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात संस्थापक अध्यक्ष स्व.बळीराम दखने यांचा पुण्यतिथी निमित्य श्रध्दाजंली अर्पण करून अभिवादन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश यादव, प्रमुख अतिथि विकास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, पर्यवेक्षक सचिन अल्लडवार, यतीन पशीने आदी मान्यवरांचा हस्ते स्व.बळीराम दखने यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.







