शेतकरी कष्टकरी महासंघाची जनजागृती संवाद बैठक संपन्न
कन्हान,ता.१८ जानेवारी
पारशिवनी तालुक्यातील पेंच नदी काठावरील मेहंदी गावात शेतकरी, कष्टकरी महासंघाची जनजागृती संवाद बैठकीला गावातील शेतक-यानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हितार्थ लढयात सहकार्य व सहभागी होण्याची हमी व समर्थन केले.
आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करीत असुन कृषी प्रदान देशात शेतकरी दैना अवस्थेत येऊन पोहचला आहे. तरी कुणीही शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर बोलताना दिसत नसल्याने बळीराजाची दैना अवस्था निर्माण झाल्याने रामटेक लोकसभा माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात ” शेतकरी कष्टकरी महासंघाची स्थापना करून पहिल्यांदा नागपुर जिल्हा व रामटेक लोकसभा अंतर्गत ग्रामीण भागातील गावामध्ये शेतकयांच्या भेटी, संवाद सभा व बैठकी घेऊन हित गुज करित जनजागृती कार्यक्रमांतर्गत पारशिवनी तालुक्यातील पेंच नदी काठावरील मेंहदी गावातील मॉ दुर्गा मंदिराच्या आवारात माजी खासदार प्रकाश जाधव, डॉ वराडे, चंद्रभान महाराज बेहुणे, वासुदेव खंडाते, ज्ञानचंद देवळे, विठ्ठलजी ठाकुर, दिलीप राईकवार आदींच्या प्रमुख उपस्थित गावातील शेतक-याशी संवाद साधुन जनजागृती करण्यात आली.






