Home Breaking News श्री शिव महापुराण कथा व राधानाम रस प्रवाह

श्री शिव महापुराण कथा व राधानाम रस प्रवाह

10

श्री शिव महापुराण कथा व राधानाम रस प्रवाह

 कन्हान,ता.१८ जानेवारी

    तिळ संक्रांत चतुर्थी महोत्सवा निमित्त श्री शिव महापुराण समिती व्दारे पांधन रोड, गणेश मंदीर सामोरील प्रांगणात श्री शिव महापुराण कथा व श्री राधानाम रस प्रवाहचे आयोजन करण्यात आले. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष राजु बाबु राठी यांनी केले आहे.

   श्री शिव महापुराण समिती कन्हान व्दारे रविवार (दि.२१) जानेवारी सकाळी ११.०० वाजता मंगल कलश यात्रा श्री गणेश मंदिरातुन काढुन शहर भ्रमण करून श्री कैलासधाम ला पोहचुन शिव महापुराण महात्म्य वृदांवन (उ.प्र.) येथील ११ वर्षीय देविका दिक्षित यांच्या सुमधुर वाणीने सुरू करण्यात येईल.

    सोमवार ( दि.२२) ला शिवलिंग प्रगटन कथा, मंगळवार ( दि.२३ ) नारदाची कामदेवा वर विजय कथा, बुधवार (दि.२४) श्री कुबेर ची उत्पत्ती व सती चरित्र कथा, गुरू वार (दि.२५)  भगवान शंकर व सती विवाह उत्सव कथा, शुक्रवार (दि.२६) भगवान कार्तिकेय ची जन्म कथा, शनिवार (दि.२७) व्दादश ज्योतिलिंग कथा, रविवार (दि.२८) जानेवारी २०२४  रूद्राभिषे क श्री पंचकुंडीय गणेश महायज्ञ, हवन पूर्णाहुति करून समापन करण्यात येईल. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री शिव महापुराण आयोजन समिती कन्हान अध्यक्ष दिलीप जैस्वाल, कार्याध्यक्ष राजु राठी व रमण गांधी, सचिव शैलेष झेंडे, अंकित यादव, सुरेश अहिर कर, संतोष पाली, प्रकाश तिवारी, अमित थटेरे, चंद्र कुमार चौकसे, सर्वेश तिवारी, अनिल चौकसे सह मान्यवर सदस्य परिश्रम करून सहकार्य करित आहे.