रेल्वे स्टेशन कन्हान येथे पोलिसांची मॉक ड्रिल
भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास, पोलिसाची रंगित तालिम
कन्हान, ता. २४ जानेवारी
नागपुर ग्रामिण जिल्हयातील पोलीस स्टेशन कन्हान येथे भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास सदर वेळची परिस्थीती योग्य प्रकारे हाताळण्यात यावी.

या करिता रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर रूम मध्ये अनधिकृत प्रवेश करून स्टेशन मास्टर ला बंधक बनवुन घेतले आहे अशा माहिती वरून रंगीत तालिम (मॉक ड्रिल) घेण्यात आली.

मंगळवार (दि.२३) ला ३.४५ वाजता पोलीस स्टेशन कन्हान हद्दीतील रेल्वे स्टेशन कन्हान येथे दोन बंदुकधारी अतिरेकी यांनी रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर रूम मध्ये अनधिकृत प्रवेश करून स्टेशन मास्टर ला बंधक करून घेतले आहे.

अशी माहिती मिळाल्याने लगेच पोलीस कंट्रोल रूम येथे तसेच वरिष्ठाना माहिती देवुन त्यांनी दिलेल्या निर्देशा प्रमाणे पोलीस स्टेशन कन्हान पोलीस तसेच पोलीस मुख्यालय ना ग्रा येथिल क्युआरटी व आरसीपी पथक, पोलीस स्टेशन खापर खेडा, मौदा, रामटेक, पारशिवनी, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, सुरक्षा शाखा, वाहतुक शाखा, बॉम्ब शोधक, नाशक पथक नाग्रा, एटीएस नागपुर यांना घटनास्थळी बोलावुन संयुक्तरित्या विशेष मोहिम राबवुन रेल्वे स्टेशन स्टेशन मास्टरचे रूम मध्ये अनाधिकृत प्रवेश करणारे अतिरेकी पैकी एकाला ठार करण्यात आले व एकाला जिवंत ताब्यात घेण्याची रंगित तालीम (मॉक ड्रिल) घेण्यात आली.

पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत भविष्यात दहशतवादी हल्ला झाल्यास सदर वेळची परिस्थीती योग्य प्रकारे हाताळण्यात यावे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सदर परिस्थती हाताळण्याचा अनुभव यावा म्हणुन पोलीस अधिक्षक आदेशाने सदर रंगीत तालिम घेण्यात आली.





