राष्ट्रीय पदक विजेते बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सत्कार
कन्हान,ता.२८ फेब्रुवारी
सैम्बो रेसलिंग चॅम्पियन शिप खेळाची राष्ट्रीय स्पर्धा महाराष्ट्रातील संभाजी नगर येथे पार पडली. यात नागपुर जिल्हयाने वीस पदक पटकाविले असुन बीकेसीपी शाळेच्या विद्यार्थी खेडाळुनी अकरा पदक जिकुन शाळेचे नाव लौकीक केल्याने या विजेते खेडाळुंचा शाळेच्या वतीने थाटात जल्लोषात सत्कार करण्यात आला आहे.

संभाजीनगर, महाराष्ट्र येथे ( दि.२६ ते ३०) जानेवारी दरम्यान सैम्बो रेसलिंग चॅम्पियन शिप खेळाचे आयोजन केले होते. या राष्ट्रीय स्तरावरील खेळात बीकेसीपी शाळेतील २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हा खेळ अतिशय कठिण असुन देखील विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या खेळात नागपुर जिल्हाने स्वर्ण १०, रजत ०६ व कास्य ०४ असे २० पदक प्राप्त केले. बीकेसीपी शाळेतील विद्यार्थ्यानी स्वर्ण ०७, रजत ०३ व कास्य ०१ असे ११ राष्ट्रीय पदक जिकुन प्राविण्य प्राप्त करित स्वत:चे, आई वडिलांचे आणि शाळेचे नाव गौरान्वित केल्याने सोमवार (दि.२६) फेब्रुवारी ला बीकेसीपी शाळेच्या पटांगणात सत्कार घेण्यात आला.

समारंभात विजेत्या खेडाळुचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नाथ मॅडम, प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती रूमाना मॅडम, जेष्ट शिक्षक विनयकुमार वैद्य यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, विविध भेट वस्तु देऊन जल्लोषात सत्कार करून प्रोत्साहित करण्यात आले. पदक विजेते विद्यार्थ्यी खेडाळुनी आपल्या यशाचे श्रेय क्रिडा शिक्षक अमितसिंग ठाकुर सर यांना दिले. यावेळी नाथ मॅडम आणि अमित सर यांनी आपल्या मार्गदर्शनातुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. पालक अनिल मगर यांनी मुलांना प्रोत्साहन पर दोन शब्द संबोधित केले.





