कन्हान शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याकरिता ठिय्या आंदोलन
नारी शक्ती संघर्ष समितीचा पुढाकार
कन्हान, ता.२९ फेब्रुवारी
मुली व महिलांची सुरक्षा, समाजकंटाका वर नियंत्रण आणि अवैद्य धंद्यावर आळा घालण्या करिता नारी शक्ती संघर्ष समिती व्दारे कन्हान, कांद्री शहरातील चौका-चौकात आणि टेकाडी बस स्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्या करिता तारसा रोड चौकात एक दिवसीय ठिय्या आंदोलन करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात आली.





