भारतीय जनता पार्टी पक्षाचा दिला शंकर चहांदे यांनी राजीनामा
रामटेक लोकसभा आरक्षित जागा लढवण्यास इच्छुक
कन्हान,ता.२३ मार्च
रामटेक लोकसभा अनुसूचित जाती करिता आरक्षित असतांना पक्षाने शंकर चंहादे यांच्या नावाचा विचार करणे भारतीय जनता पार्टी ला अभिप्रेत होते. परंतु जुन्या आणि एकनिष्ठ सदस्य नावाचा विचार करण्यात येत नसल्याने शंकर चंहादे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाचा प्राथमिक सदस्य व सर्किय पक्षाचा राजीनामा दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

शंकर चिंतामन चहांदे रा.कन्हान तालुका पारशिवनी, जिल्हा नागपुर सन १९९२ पासुन भारतीय जनता पार्टी पक्षा मध्ये कार्यरत आहे. ज्यावेळी अनुसूचित जाती कडुन कोणीही व्यक्ति निवडणुक लढण्यास तयार नव्हते तेव्हा सन १९९२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य पदाची निवडणुक लढविण्यात आली. तेव्हा पासुन आजतागायत भारतीय जनता पार्टी ने वेळोवेळी जी जी पक्ष हितार्थ आणि आदेशान्वये जबाबदारी दिली ती पक्षाशी एकनिष्ट राहुन प्रामाणिक पणे कोणताही स्वार्थ न ठेवता पार पाडली.





