अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या
बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टीची मागणी
कन्हान, ता.२४
पारशिवनी तालुक्यात सतत होणाऱ्या दमदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टी व्दारे पारशिवनी तहसिलदार राजेश भांडारकर यांना निवेदन देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पारशिवनी तालुक्यात सतत होणाऱ्या दमदार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने बहुजन रिपब्लिकन सोश्यालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने यांचे निर्देशनुसार आणि प्रदेशाध्यक्ष विशेष फुटाणे यांच्या मार्गदर्शनातं व रामटेक विधानसभा प्रमुख शांताराम जळते यांच्या नेतृत्वात पारशिवनी तहसिलदार राजेश भांडारकर यांना नुकतेच निवेदन देऊन तालुक्यातील सर्वत्र दमदार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. प्रामुख्याने धान, कापुस, तूर, सोयाबीन यासह अनेक पिकांचे नुकसान होत आहे. तसेच टेकाडी (को.ख.) पारिसरातील पेंढारवाही नाल्याच्या पुरामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील पीक सडत असुन शेतात जाणे येणे करण्याचा रस्ता पूर्ण पणे बंद झाला आहे.





