कन्हान – पिपरी नगर परिषद पोट निवडणुक करिता उद्या मतदान , सोमवार ला मतमोजणी
महाविकास आघाडी काॅंग्रेस पक्षाचे उम्मेदवार रिंगणात तर भाजपा – शिवसेना (शिंदे गट) महायुतीत फुट
सहा महिन्यासाठी निवडणुक कशाला ? काय सिद्ध करणार
कन्हान,ता. १०
कन्हान – पिपरी नगर परिषद प्रभाग क्रमांक सात सदस्यपदाच्या एका रिक्त जागेसाठी उद्या रविवार (दि.११) ऑगस्ट ला मतदान होणार आहे. या निवडणुकी मध्ये महाविकास आघाडी कडुन काँग्रेस पक्षाचे उम्मेदवार सौ.राखी संदीप परते निवडणुकीत उभी असुन भाजपा – शिवसेना (शिंदे गट) महायुती मध्ये फुट पडल्याने भाजपा पक्षाचे उम्मेदवार नंदकिशोर शंकर श्रीरामे व शिवसेना शिंदे गटाचे उम्मेदवार हिरालाल चंद्रभान नारनवरे निवडणुकी च्या मैदानात उभे आहे.





