Home Breaking News पोटनिवणुकीत महाविकास आघाडी च्या राखी परते विजयी

पोटनिवणुकीत महाविकास आघाडी च्या राखी परते विजयी

11

पोटनिवणुकीत महाविकास आघाडी च्या राखी परते विजयी

कन्हान, ता.१२ प्रतिनिधी 

      नगरपरिषद कन्हान-पिपरी प्रभाग क्र. ७ येथे अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या एका रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांनी ४६.९६ टक्के मतदान केले.

     पोट निवडणुकीत निवडणुक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे अनेक मतदारांचे यादीतुन नाव गहाळ झाले असताना सुध्दा महाविकास आघाडीतील कॉग्रेस पक्षाच्या राखी परते यांनी भाजप च्या नंदकिशोर श्रीरामे यांच्या पेक्षा २८ मते जास्त घेऊन विजयी झाल्या.

     तर नगरपरिषद व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिरालाल नारनवरे यांना तिस-या क्रमांकाची मते देऊन सत्ताधारी विरूध्द असलेला रोष मतदारांनी व्यक्त केला.

   निवडणुकीत ३० टक्के च्या वर स्थानिक मतदार, मतदाना पासुन वंचित केल्यावर सुध्दा शिवसेना (उबाठा) गटाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतुत्वात महाविकास आघाडी तील शिवसेना (उबाठा) गटाचे तालुका प्रमुख कैलास खंडार, समीर मेश्राम, कॉग्रेस चे खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, उपाध्यक्ष नरेश बर्वे, युवक कॉग्रेसचे आकिब सिद्दीकी, नगरसेविका रेखा टोहणे, राकॉ (शरद पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष किशोर बेलसरे, अशोक पाटील, बीआरएसपी राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सुखलाल मडावी, प्रहारचे नगरसेवक विनय यादव, आप चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर दारोडे सह महाविकास आघाडी च्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्या च्या सहकार्याने विजयश्री संपादन करण्यात आल्याने हर्षोउल्हास साजरा करण्यात येत आहे.