१५ ऑगस्ट ७८ व्या स्वातंत्र दिना निमित्य भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था कन्हान व्दारे तारसा रोड, कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सह स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा १५ ऑगस्ट २०२४ ला ७८ व्या स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था कन्हान व्दारे महाकाली कॉम्पलेक्स, तारसा रोड, कन्हान येथे भव्य रक्तदान शिबीर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सह स्वातंत्र दिन उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. याकरिता परिसरातील युवकांनी ” महादान, रक्तदान ” करून देश प्रेम जागृत करावे. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यश स्वितेकरिता भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था कन्हान अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर, उपाध्यक्ष समशेर पुरवले, हरिष तिडके, भरत चकोले, सचिव रजनिश (बाळा) मेश्राम, सहसचिव अशोक नारनवरे, कोषाध्यक्ष सुनिल लक्षणे, सदस्य मृणाल सरोजकर, आशिष वानखेडे, रामभैया थदानी, मयुर माटे, अनिकेत नानोटे, शैलेश ढोके, राधेश्याम राऊत, राजु चोपकर, किशोर नांदुरकर, नंदु बारई सह युवा कार्यकर्ता परिश्रम घेत आहे.