पं.ज.नेहरू विद्यालयात कु.शर्तिका टेकाम यांच्या हस्ते ध्वजारोहण
कन्हान,ता.१५
पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय व भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने ७८ वा “स्वातंत्र्य वर्धापन दिन” नगर सुधार समितीचे पदाधिकारी, नगरातील गणमान्य नागरिक, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम नगर सुधार समितीच्या अध्यक्षा सौ.छायाताई प्रकाशराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व इयत्ता १० वी ला प्रथम आलेली पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाची विद्यार्थिनी कु.शर्तिका समरसिंग टेकाम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाला नगर सुधार समितीचे पदाधिकारी मनोहर कोल्हे, वासुदेव चिकटे, मिलिंद वाघधरे, प्रकाशराव नाईक, दिनकर मस्के व सौ.यशोदाताई हिरालाल कांबळे अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती आणि अंबादास चकोले, पुरुषोत्तम कुंभलकर, महेश बिसणे, केतन भिवगडे, वसंतराव इंगोले, सौ मायाताई इंगोले, सौ.सुनिता येरपुडे इत्यादी नागरिक उपस्थित होते.





