Home कृषी सुनील केदार यांच्या हस्ते उत्कृष्ट बैल जोड्यांना पुरस्कार

सुनील केदार यांच्या हस्ते उत्कृष्ट बैल जोड्यांना पुरस्कार

29

सुनील केदार यांच्या हस्ते उत्कृष्ट बैल जोड्यांना पुरस्कार

सावनेर : पारंपारिक पद्धतीने माताखेडी पोळा मैदानात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
केदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शंभराहून अधिक बैल जोडी मालकांना दुपट्टा व भोजारा देऊन सन्मान करण्यात आला तसेच आयोजकातर्फे उत्कृष्ट बैलजोडींना मानाचा पुरस्कार माजी आमदार मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमानंतर अल्पवहाराचा कार्यक्रम योगेश पाटील यांच्याकडे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर तसेच शेतकऱ्यांच्या  विकासावर सहकाऱ्यांसोबत विशेष चर्चा  करण्यात आली.


आयोजक मंडळ तर्फे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल, डॉ. प्रा. योगेश पाटील, तुलसी आवते तर कार्यक्रमाचे संचालन किशोर धुंडोले यांनी केले.
मंचावर उपस्थित पाहुणे म्हणून पवन जयस्वाल,डोमासाव सावजी, प्रा. साहेबराव विरखरे, एडवोकेट श्रीकांत पांडे, मनोज बसवार, राजू खांडे, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे, निलेश पटे, सुनील चाफेकर तेजसिंग सावजी, शफिक सय्यद, गोपाल घटे, व्यापारी संघाचे अध्यक्ष अतुल पाटील, सचिव दिनेश दमाहे व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.