नवरात्री रास गरबा महोत्सव कन्हान येथे जोमात रंगत
माहेर महिला मंच व्दारे रास गरबा महोत्सवाचे आयोजन
कन्हान,ता.०६
माहेर महिला मंच कन्हान, कांद्री, टेकाडी व्दारे नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरिल कुलदीप मंगल कार्यालय मैदान कन्हान येथे आदी शक्ती, कुलस्वामिनी दुर्गा मातेचे नवरात्र महिला शक्ती प्रेरित या महोत्सवात करण्यात आली आहे. मातेच्या नामस्मरणात रास गरबा खेळत, जयघोष करित, भक्तीत रसात तल्लीन हो़ऊन आंनदोत्सव कन्हान येथे रास गरबा महोत्सव २०२४ अतिशय जोमाने चांगलाच रंगत आणुन परिसरातील भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
गुरूवार (दि.३) ऑक्टोंबर रात्री ८ वाजता माहेर महिला मंच कन्हान, कांद्री, टेकाडी व्दारे कुलदीप मंगल कार्यालय मैदान जे.एन. रोड कन्हान येथे नवरात्री उत्सव थाटात साजरा करण्यास येत आहे. रास गरबा महोत्सव २०२४ आदीशक्ती, कुलस्वामिनी दुर्गा मातेची विधीवत पुजा अर्चनाचे आयोजन नरेश बर्वे व सौ.रिता बर्वे यांनी केले आहे. रास गरबा मैदानावर प्रतिमे सामोर घट स्थापना करून रामटेक खासदार श्यामकुमार बर्वे, रश्मी बर्वे, शिवसेना माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, कॉग्रेस नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मु़ळक यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित व मातेची आरती करून रास गरबा महोत्सवाची थाटात सुरुवात करण्यात आली.

घर आणि मुलाबाळांच्या सांभाळ कऱणा-या महिलांना स्वतंत्र पणे सामाजिक जिवनात मुलांंबाळांसह नारी शक्ती प्रेरित नवरात्रीचा आंनदोत्सव साजरा करता यावा. महिलांना हक्काचे मंच मिळावे या सार्थ उद्देशाने रास गरबा महोत्सवाचे आयोजन करून मागील पंधरा दिवसा पासुन रास गरबाची तालिम घेत छोटया मुली, महिला व १५ वर्षाचे आत मुले असे ३०० च्यावर स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

नव दिवस रास गरबा खेळणा-या उत्कुष्ट स्पर्धक तसेच सहभागी विविध स्पर्धकांना मंच व्दारे बक्षीस देऊन गौरव करून प्रोत्साहित करण्यात येत आहे.





