Home चंद्रपूर हनुमान नगर हनुमान मंदिर येथे सकल हिंदू समाजातर्फे विशाल हिंदू संमेलन संपन्न

हनुमान नगर हनुमान मंदिर येथे सकल हिंदू समाजातर्फे विशाल हिंदू संमेलन संपन्न

12

*हनुमान नगर हनुमान मंदिर येथे सकल हिंदू समाजातर्फे विशाल हिंदू संमेलन संपन्न*
चंद्रपूर दि.23:- हनुमान नगर,हनुमान मंदिर येथे सकल हिंदू समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशाल हिंदू संमेलन अत्यंत भक्तिमय,उत्साही आणि विचार प्रवर्तक वातावरणात पार पडले.सनातन संस्कृतीचे जतन समाजातील ऐक्याची वृद्धी आणि समरसत्तेच्या संदेश प्रत्येकाच्या मनामनात रुजवण्याच्या पवित्र हेतूने या संमेलनाच्या आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन,माल्याअर्पण आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला औपचारिक प्रारंभ करण्यात आला. मंचावर संत श्री मनीष महाराज,प्रमुख वक्ते म्हणून विदर्भ प्रांत गौसेवा सहसंयोजक,रमेश मंडाळे,रमेश येगिनवार,मनोहर बुक्कावार,भाऊराव झाडे,पंकज बेले,नगरसेवक सुभाष भाऊ कासनगोटूवार,विजय येंगलवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख वक्ते रमेश मंडाळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या पंचसूत्री कार्यक्रमाचे सविस्तर विवेचन केले.सामाजिक समरसता, पर्यावरण,संरक्षण,कुटुंब प्रणालीची मजबुती,आणि राष्ट्रनिष्ठा या विषयावर त्यांनी ठोस विचार प्रगट केले.संत श्री मनीष महाराजांनी आपल्या सुमधुर वाणीतील आशीर्वचनातून हिंदू धर्माची महान परंपरा,यातील आध्यात्मिक मूल्ये आणि संस्काराची परंपरा यांचे महत्त्व स्पष्ट केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून पंकज बेले,यांनी आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत,हिंदू संमेलनाची आवश्यकता अधोरेखित केली.संचालन रेणुका देशपांडे,आभार सुमित बेले यांनी केले.या कार्यक्रमाला हनुमान नगर, गणेश नगर,श्रद्धा नगर वार्डातील गणमान्य व्यक्ती महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.