Home क्राईम रेती घाटात तलवार-काठी हाणामारीत एक ठार व इतर काही लोक जखमी

रेती घाटात तलवार-काठी हाणामारीत एक ठार व इतर काही लोक जखमी

14

रेती घाटात तलवार-काठी हाणामारीत एक ठार व इतर काही लोक जखमी
पोलिसांनी ३ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता 9 मार्च पर्यन्त पी सी आर दिला असून इतरांचा शोध सुरू आहे
वरोरा (श प्र). वरोरा तालुक्यातील बामर्डा येथील वर्धा नदीच्या रेती घाटावर थकबाकी रकमेच्या वादातून रेत व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवार दि.1 मार्च रोजी सायंकाळी अंदाजे 8,30 वा उघडकीस आली आहे.याप्रकरणी वरोरा पोलिसांनी 10 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून 3 जणांना अटक करून आज न्यायालयात हजर केले तेथून त्यांना 9 मार्च तारखेपर्यंत पोलिस कस्टडित पाठवण्यात आले आहे.
हिंगणघाट येथील रहिवासी पंकज केशवराव वानखेडे (वय 39 वर्षे) व त्याचे साथीदार बामर्डा ता. वरोरा येथील वर्धा नदीचा रेती घाट शासकीय लिलावाद्वारे सध्या नागपूर रहिवासी भद्रावती येथील गीतेश सातपुते याच्याकडून २ कोटी ५ लाख रुपयांना खरेदी करण्यात आला होता. सदर रक्कम मे 2025 मध्ये बँक खात्यात जमा करण्यात आली. घाटाचा करार 9 जून 2026 पर्यंत वैध होता, मात्र 25 जानेवारी 2026 रोजी सातपुते यांनी घाट परत घेतला व उर्वरित 98 लाख 64 हजार 621 रुपये 28 फेब्रुवारीपर्यंत परत करण्याचे मान्य केले. तक्रारदारांनी मुदत संपूनही रक्कम परत न केल्याने रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास बामरडा रेती घाटात त्यावेळी काम सुरू होते. सायंकाळी 6.55 च्या सुमारास दोन पोकलेन मशीन रस्त्यावर अडवण्यात आल्या.
यानंतर आरोपी अमोल रामचंद्र कामडी, अक्षय विजयराव खडसे, सौरभ दिलीपसिंग ठाकूर, सुनील नारायण झोरे, प्रफुल सूर्यभान उमाटे, अतुल पुरुषोत्तम मोटघरे व अन्य तीन-चार जणांनी त्याच्यावर तलवारी, लाकडी दांडके व लोखंडी सळ्याने हल्ला केला. सौरभ ठाकूर याने भरत दयानंद नागपाल यांच्यावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. त्याला मारहाण करून नदीत फेकून दिले. स्थानिक जलतरणपटूच्या मदतीने त्याला बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात हिंगणघाट येथे नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वरोरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून सुनील झोरे, प्रफुल उमाटे व अतुल मोटघरे यांना अटक करून आज न्यायालयात हजर केले तेथून आरोपींना 9 पर्यंत पीसीआरमध्ये पाठवण्यात आले आहे.पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. समोर चा तपास पोलिस निरिक्षक ओमप्रकाश सोनटक्के करीत आहे