विदेशी दारूवर कार्यवाही
वरोरा पोलिसांची मोठी कामगिरी ५,४३,५६० रुपयाचा मुद्देमाल जप्त
वरोरा
मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून पाटबंधारे विभाग ते वरोरा बसस्टॉप कडे जाणाऱ्या रोडवर चालक नामे चंदन प्रताप राऊत मालवीय वॉर्ड वरोरा याचे एक जुनी मारुती सुझुकी ,स्विफ्ट डिझायर कंपनीच्या गाडी क्र.Dl oc cw५९०८ या गाडीची पाहणी केली असता एकूण ३५,८८० रुपयाचा मुद्देमाल व गाडीची किंमत ४,००,००० असा एकूण ४,३५,८८० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.तसेच वणी बायपास वरोरा येथील द्वारकाधीश लान जवळील चालक नामे कुणाल मनोहर पेंदाम रा.वणी याची चेतक बजाज कंपनीची मोपेड वाहन क्र.एम एच २९ सी एच ९८२८ या वाहनाच्या पायदानवर असलेल्या पिशवीची पाहणी केली असता एकूण की.६४००रुपयाचा विदेशी दारूचा मुद्देमाल व दारू वाहतूक करण्याकरिता वापरण्यात आलेली मोपेड क्र.वाहनाची किमंत १००००० रू.असा एकूण की.१,०६,४०० रू चा मुद्देमाल अवैध रित्या मिळून आला तसेच डोंगरगाव रेल्वे येथील विकास ज्ञानेश्वर मडावी याचे ताब्यात असलेल्या पिशवीची पाहणी केली असता एकूण १२८० रुपयाचा देशी दारू मुद्देमाल मिळून आला.
असा एकूण किंमत ५,४३,५६० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.सर्व मुद्देमाल वरोरा पोलिसांनी जप्त केला.तसेच आरोपींना अटक करण्यात आली.वरोरा पोलिसांची मोठी कार्यवाही आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक ,अप्पर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा,पोलीस निरीक्षक वरोरा,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनी शरद शाम भस्मे, पोहवा संदीप मुळे, पोहवा प्रशांत नागोसे,पो अ.विशाल राजूरकर,पो . अ.मनोज ठाकरे, पोहवा अमित नवघरे, पोहवां सुखराम यादव,पो अ.सौरभ कूलचे यांनी केली आहे.




