*आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात ८ मार्चला विदर्भस्तरीय आमदार श्री बॉडीबिल्डिंग स्पर्धा,*
*मुंबईचे सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर हरमीत सिंह विशेष आकर्षण*
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव २०२६ अंतर्गत चंद्रपूर येथे विदर्भस्तरीय आमदार श्री बॉडीबिल्डिंग स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मनपा पटांगण गांधी चौक येथे पार पडणार आहे.
या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांतील नामांकित बॉडीबिल्डर्स सहभागी होणार असून, या उपक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी उभारी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे मुंबईचे सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर हरमीत सिंह यांची उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेला अधिक रंगत येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
स्पर्धेसाठी आकर्षक रोख पारितोषिकांचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये “आमदार श्री” किताबासाठी ५१ हजार रुपये व ट्रॉफी, बेस्ट पोझर ३१ हजार रुपये व ट्रॉफी, तर बेस्ट इम्प्रुव्हमेंटसाठी २१ हजार रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे. याशिवाय ग्रुप स्टेजमधील एकूण रोख पारितोषिके २ लाख ५१ हजार रुपयांची असणार आहेत.
विदर्भातील नामांकित खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने ही स्पर्धा क्रीडाप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




