Home चंद्रपूर *मान्यवर कांशीराम साहेब यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन*

*मान्यवर कांशीराम साहेब यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन*

63

*मान्यवर कांशीराम साहेब यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन*

चंद्रपूर : बहुजन समाजाचे महान नेते, बहुजन समाज पक्षाचे संस्थापक आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीचे प्रणेते मान्यवर कांशीराम साहेब यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन करण्यात आले.

मान्यवर कांशीराम साहेब यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित, शोषित आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी समर्पित केले. त्यांनी डीएस-४ (दलित शोषित समाज संघर्ष समिती) ची स्थापना करून समाजात जागृती निर्माण केली. तसेच बामसेफ (Backward and Minority Communities Employees Federation) या संघटनेच्या माध्यमातून देशभरातील सुशिक्षित कर्मचारी वर्गाला संघटित करत समाज उन्नतीचा मार्ग दाखविला.

त्यांची सर्वात मोठी देण म्हणजे बहुजन समाज पक्ष (BSP) ची स्थापना होय. या पक्षाच्या माध्यमातून वंचित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व, स्वाभिमान आणि सशक्त आवाज मिळाला.
“ज्याची जितकी संख्या भारी, त्याची तितकी हिस्सेदारी” हा नारा देत त्यांनी लोकशाहीला सामाजिक न्यायाची दिशा दिली. तसेच “बाबांच्या मुलांच्या मर्जीशिवाय या देशाचे शासन चालू देणार नाही” हा त्यांचा निर्धार बहुजन समाजाच्या हक्कांसाठी असलेल्या त्यांच्या कटिबद्धतेचे प्रतीक होता.

मान्यवर कांशीराम साहेब यांचे मत होते की बहुजन समाजाची सत्ता आल्यास प्रत्येक मंत्री इतका सक्षम असावा की तो कोणत्याही खासगी सहाय्यकाशिवाय शासन चालवू शकेल. त्यांनी राजकारणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनवून संघटनेच्या बळावर जनजागृती घडवून आणली.

आजही त्यांचे विचार, त्यांचे मिशन आणि त्यांची संघर्षमय वाटचाल समाजासाठी प्रेरणादायी मार्गदर्शक ठरत आहे.

अशा महान सामाजिक-राजकीय योद्ध्याला शत-शत नमन.

*“कांशीराम तेरी नेक कमाई, तने सोती कौम जगाई”*

चला, त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ देण्याचा संकल्प करूया.

जय शिवाजी! जय ज्योती! जय भीम! जय कांशीराम! जय बहुजन!