नागभिड येथे सैनिक शेतकरी वेल्फेअर फाऊंडेशनचे भव्यदिव्य उद्धाटन;
नागभिड : प्रतिनिधी:-
समाज, सैनिक आणि शेतकरी यांच्यासाठी एक प्रेरणादायी आणि स्तुत्य उपक्रम नागभीडमध्ये पाहायला मिळाला… दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी नागभीड येथे सैनिक शेतकरी वेलफेयर फाऊंडेशन – SSWF चा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला… या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष मा. श्री मनोजकुमार डांगे यांच्या हस्ते करण्यात आले, तर उपाध्यक्ष मा. श्री निलेश निकम, सचिव मा. श्री संजय सतई आणि यांत्रिक प्रमुख अरविंद पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला… यावेळी जिल्हाध्यक्ष संजय कुथे, तालुका अध्यक्ष विक्रांत गजपुरे, रामराव पंचभाई, महिला अध्यक्षा कनिजा शेख तसेच विभागप्रमुख सुभाष गजभे आणि राहुल रामटेके यांच्यासह विविध विभागातील विभाग प्रमुख, केंद्र प्रमुख आणि कोअर कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते… संघटनेच्या विस्तारासाठी सर्व पदाधिकारी सक्रियपणे कार्यरत असल्याचे यावेळी दिसून आले… अध्यक्षांनी बोलताना ठामपणे सांगितले की, “SSWF ही संस्था समाज, सैनिक आणि शेतकरी यांच्यासाठी सतत मदतीचा हात देत राहील आणि झपाट्याने प्रत्येक गावापर्यंत पोहोचून एक मजबूत आधार निर्माण करेल…” कार्यक्रमात आरोग्य सेवा, आर्थिक मदत, शेतकरी सवलती, कर्जमुक्ती तसेच विविध समाजोपयोगी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच अनेक लाभार्थ्यांना या योजनांतर्गत धनादेशांचे वितरण करण्यात आले… “जय जवान, जय किसान” या ब्रीदवाक्यानुसार संस्था समाजसेवेसाठी सज्ज झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले…




