रोडरणे कापूस जमा करण्याचे काम सुरू असताना कापसाच्या गंजीला आग
रविकमल कॉर्टेक्स जिनिंग मधील घटना
जवळपास 15 हजार क्विंटल कापूस व एक ट्रॅक्टर व इतर सामुग्री जळून खाक
अंदाजे 12 करोडचे नुकसान
वरोरा
वरोऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवर रविकमल काँटेक्स जीनिंग प्रेसिंग युनिट असून 13 एप्रिल 2026 ला रोडरणे कापूस जमा करण्याचे काम सुरू असताना अचानक कापूस गंजीला आग लागली.पहाता – पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि जवळपास 15 हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला.आगीच्या भक्षस्थानी एक ट्रॅक्टर व इतर सामुग्री सुद्धा जळून खाक झाले.12 कारोडचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
आग विझविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कृषी उत्पन्न बाजार समिती वणी,हिंगणघाट,जी एम आर कंपनी ,आदी अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली आणि कर्मचारी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न करीत आहे.आग अजूनही धुमसत आहे.एक विशेष म्हणजे जेव्हा आग लागली त्यावेळेस मात्र कामावर असणारी मजूर महिला गीताबाई हिने सुरवातीला बकेट ने पाणी आणून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.आग दुपारी 4 वाजताचे सुमारास लागल्याची माहिती आहे.आगीमध्ये जीवितहानी झाली नाही.
मार्डा रोड स्थित रविकामल कॉर्टेक्स जिनींग प्रेसींग असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला असून 13 एप्रिल ला रोडरणे कापूस जमा करण्याचे काम सुरू असताना अचानक आग लागली.दोन दिवस फॅक्टरी बंद असल्यामुळे खरेदी बंद होती.सदर आग ही तापमानामुळे लागली असावी असा अंदाज वर्तविला जात असून जीनींग चे बाजूला शेतकऱ्यांच्या शेती लागल्या आहे .वणवा लावल्यामुळे एखादी अग्नीची तिडकी उडाली असावी त्यामुळे आग लागली असावी असेही बोलल्या जात आहे.परंतु आगीचे नेमके ठोस कारण कळू शकले नाही.घटनास्थळावर तहसीलदार ,कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
बॉक्स
मार्डा रोडवर तीन फॅक्टरी असून आजूबाजूला शेतकऱ्यांच्या शेत्या आहे.त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात शेतातील कचरा साफ करण्यासाठी वणवा लावत असतात.त्यामुळे एखादी अग्नीची तीडकी उडून आग लागून करोडॉ रुपयाचा कापूस माल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडतो त्यामुळे जिणींग प्रेसिग संचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असतात.शेतकरी शेतात लावत असलेले वणवे बंद होणे गरजेचे आहे.
मा.अमोल मुथा
उद्योजक




