Home चंद्रपूर *नागभिडच्या स्वामी विवेकानंद बालगृहात ‘भीम जयंती’ उत्साहात साजरी*

*नागभिडच्या स्वामी विवेकानंद बालगृहात ‘भीम जयंती’ उत्साहात साजरी*

16

*नागभिडच्या स्वामी विवेकानंद बालगृहात ‘भीम जयंती’ उत्साहात साजरी*

नागभिड, दि. १४ एप्रिल:
लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे बालगृह, नागभिड येथे प्रज्ञासूर्य Dr. B. R. Ambedkar यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालगृहाच्या अधीक्षिका कुमुदिनी बारसागडे मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक प्रविणजी येरणे, ज्योतीताई भुरले व ज्योतीताई झाडे उपस्थित होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नरेंद्र बोरकर सर यांनी मंच सुशोभित केला.

प्रास्ताविक व मार्गदर्शन करताना बारसागडे मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्य मार्गदर्शनपर भाषणात डॉ. आंबेडकरांचे विचार आणि चारित्र्य आजच्या तरुण पिढीत रुजविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच संस्थापक पुरुषोत्तम चौधरी हे बाबासाहेबांचा वारसा जपत समाजातील दुर्बल घटकांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचेही नमूद करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशिका रश्मी सातपुते मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिलिंद बोकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.