Home क्राईम *IPL सामन्यावर ऑनलाइन क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांवर कारवाई* *स्थानिक गुन्हे शाखेची गडचांदूर...

*IPL सामन्यावर ऑनलाइन क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांवर कारवाई* *स्थानिक गुन्हे शाखेची गडचांदूर येथे धडक मोहीम; एक मोबाईल जप्त*

18

*IPL सामन्यावर ऑनलाइन क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांवर कारवाई*

*स्थानिक गुन्हे शाखेची गडचांदूर येथे धडक मोहीम; एक मोबाईल जप्त*

चंद्रपूर, (वि.प्र,):
गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीत IPL सामन्यावर ऑनलाइन क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या इसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील माशाअल्लाह बिर्याणी सेंटर समोर काही व्यक्ती IPL सामन्यावर ऑनलाइन माध्यमातून क्रिकेट सट्टा खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत छापा टाकला.

या कारवाईदरम्यान जुबेर रसूल सय्यद (वय 22, रा. धुमणे ले-आऊट, गडचांदूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 20,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात आरोपी हा www.nice7777.fun⁠� या ऑनलाइन बेटिंग आयडीद्वारे IPL सामन्यावर क्रिकेट सट्टा खेळत असल्याचे समोर आले. तसेच त्याला बेटिंग आयडी पुरवणारा रोहित काकडे, रा. गडचांदूर याच्याविरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी गडचांदूर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 261/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 49 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.