Home चंद्रपूर *धक्कादायक! भद्रावतीत सुपारी देऊन पतीचा खून; चार आरोपी अटकेत*

*धक्कादायक! भद्रावतीत सुपारी देऊन पतीचा खून; चार आरोपी अटकेत*

15

*धक्कादायक! भद्रावतीत सुपारी देऊन पतीचा खून; चार आरोपी अटकेत*

भद्रावती (ता. प्र), दि. ४ मे २०२६ :
भद्रावती शहरात एका महिलेने पतीच्या अत्याचाराला कंटाळून सुपारी देत खून घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून गुन्हा क्रमांक ५५०/२०२६ अंतर्गत विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ मे २०२६ रोजी रात्री ते २ मे सकाळदरम्यान माजी हायस्कूल परिसर, शिवाजी नगर येथे घडली. मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला होता.

या प्रकरणात दीपमाला रवींद्र कुकडे (वय ४२) हिने पतीच्या सततच्या अत्याचारामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे कबूल केले असून खून करण्यासाठी सुमारे ९ लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यासह वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रविण जेटर आणि नंदिनी अंबारी या आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे.

घटनेत वापरण्यात आलेली मारुती कंपनीची इर्टिगा कार (MH 31 DC 8919) व तीन मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे भद्रावती पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत नागपूर येथून आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत

.