Home चंद्रपूर *म्हाडा अंतर्गत १४४ कोटींच्या विकासकामांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला आढावा* ...

*म्हाडा अंतर्गत १४४ कोटींच्या विकासकामांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला आढावा* *दुसऱ्या टप्प्यातील २४२ कोटींचा विकास आराखडा शासनाकडे सादर*

12

*म्हाडा अंतर्गत १४४ कोटींच्या विकासकामांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला आढावा*

*दुसऱ्या टप्प्यातील २४२ कोटींचा विकास आराखडा शासनाकडे सादर*

चंद्रपूर : नवीन चंद्रपूरच्या नियोजनबद्ध व सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेतला असून, म्हाडा अंतर्गत पहिल्या टप्प्यातील १४४ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपूर येथील म्हाडा विभागीय कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली.

बैठकीत प्रस्तावित कामांचे आराखडे, तांत्रिक बाबी, प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर चर्चा करण्यात आली. कामे दर्जेदार, लोकाभिमुख आणि वेळेत पूर्ण व्हावीत, अशा सूचना आमदार जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय इंगोले यांच्याशीही विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

चंद्रपूर शहरात वाढत्या नागरीकरणामुळे मूलभूत सुविधांची गरज वाढली आहे. म्हाडा अंतर्गत १ हजार ३९१.७१ हेक्टर जागा आरक्षित असून, त्यापैकी सुमारे २०० हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. या संपूर्ण क्षेत्राच्या विकासासाठी जवळपास ११ हजार कोटी रुपयांचा एकत्रित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी १४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील २४२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

या निधीतून दाताळा, कोसारा, पडोली परिसरात मुख्य डीपी रस्ते, स्ट्रीट लाईट, बंदिस्त नाली यांसह विविध मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या निधीसाठी आमदार जोरगेवार यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सातत्याने पाठपुरावा केला होता.
दरम्यान, २२ मे २०२५ रोजी नागपूर येथील म्हाडा कार्यालयात तसेच ७ मे २०२५ रोजी मुंबई मंत्रालयात म्हाडा गृहनिर्माणचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासोबत बैठक घेऊन विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यात आली होती. सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर आता निधी मंजूर झाल्याने लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.