सावनेर : महाराष्ट्र राज्य दिव्यांग ( अपंग ) संघटना भूम , जि . उस्मानाबादच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदी नागपुर जिल्हातील सावनेर तहसिल मधिल वाकोडी येथील बबलू चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . बबलू चौधरी आतापर्यंत कोणत्याही संघटनेशी जुडले नव्हते . ते मागील अनेक वर्षापासून गोरगरीब दिव्यांग व वृद्धांची सेवा करीत असतात.बबलू चौधरी यांच्या कार्याची दखल घेत उस्मानाबाद येथील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डोके , उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अमोल शेळके यांनी चौधरी यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी निवड केली .
बबलू चौधरी यांची निवड झाल्याबद्दल गणेश कान्हारकर , दत्ता धोटे ,प्रभाकर गायकवाड , राज तांडेकर , सुरेश मदनकर , रितेश निर्मल , यादोराब कान्होलकर , मोहन दोडके , नंदकिशोर चौधरी , ताराचंद कान्होलकर , धनंजय रंगारी , बबलू गायकवाड यांनी अभिनंदन केले .