Home नवी दिल्ली प्रताप वाघमारे यांनी स्वीकारला तहसीलदारपदाचा कारभार

प्रताप वाघमारे यांनी स्वीकारला तहसीलदारपदाचा कारभार

10

प्रताप वाघमारे यांनी स्वीकारला तहसीलदारपदाचा कारभार

सावनेर : जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदली सत्रात सावनेर येथील तहसीलदार दीपक कारंडे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रताप वाघमारे यांनी सावनेरचे तहसीलदार म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी प्रताप वाघमारे हिंगणा तहसील व विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल तहसीलदार म्हणून कार्यरत होते . त्यांना जवळपास १३ ते १४ वर्षाचा तहसील कामकाजाचा अनुभव असल्याने हिंगणा येथील महसूलच्या पारदर्शक कामकाजासाठी त्यांची ओळख असल्याची सर्वसामान्यात चर्चा आहे .

सावनेर तहसिल हे संपुर्ण महाराष्ट्रात रेती घाटाचा मोठा महसुल करिता ओळखले जाते .त्याकरिता सावनेर तहसिल नेहमी प्रसिद्ध झोकात राहिलेली आहे. व नव्याने रुजु झालेले तहसिलदार यांना महसुल विभागाचा दानगा अनुभव असल्याकारनाने ते रेती घाटाचा विषय कसे हाताळतात याकडे सावनेर तालुक्यातील सर्वच जनतेचे लक्ष लागले आहे.