Home नवी दिल्ली रेल्वे स्टेशन मालधका यार्ड येथे दोन गटात मारहाण

रेल्वे स्टेशन मालधका यार्ड येथे दोन गटात मारहाण

12

रेल्वे स्टेशन मालधका यार्ड येथे दोन गटात मारहाण

कन्हान : –  रेल्वे स्टेशन मालधका यार्ड येथे दोन गटात मारहाण होऊन पाच आरोपींनी फिर्यादी व तीन मित्राला मारहाण करून जख्मी केल्या प्रकरणी कन्हान पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे. 

      कन्हान पोलीस स्टेशन पासुन पुर्वेस १ कि मी वर रेल्वे स्टेशन कन्हान मालधका यार्ड येथे सोमवार (दि १९)ला सायं काळी ६ वाजता दरम्यान फिर्यादी दिपक अरविंद त्रिपाठी वय ५३ वर्ष रा विवेकानंद नगर कन्हान यास आरोपी १) हरविंद सिंग पडा २) ट्रक चालक रामु, ३) बिंदर सिंग पडा ४) करमजित सिंग पडा ५) अज्ञात व्यक्ती सर्व रा बाबा बुधाजी नगर कन्हान हयांनी संगनमत करून गैरकायदयाची मंडळी गोळा करून शिवीगाळ करित तेरे वजह से हमारे ट्रक नही भर रहे है  म्हणत फिर्यादी सोबत तीन मित्रा ना हाथबुक्याने, बेसबॉल डंडा, हॉकी, स्टीक, लोखंडी राड, बाबुच्या काठीने मारहाण करून जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीस स्टेशन चे पोउपनि सुरजुसे हयांनी कलम ३२४, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ भादंवी नुसार गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध घेत आहे.