Home Breaking News गहुहिवरा उडाण पुला वर कंटेनर ची दुचाकी ला धडक, एक जख्मी

गहुहिवरा उडाण पुला वर कंटेनर ची दुचाकी ला धडक, एक जख्मी

6

गहुहिवरा उडाण पुला वर कंटेनर ची दुचाकी ला धडक, एक जख्मी. 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस तीन किमी अंतरावर असलेल्या गहुहिवरा उडाण पुलावर कंटेनर ट्रक चालकाने दुचाकी वाहनाला धडक मारल्याने दुचाकी वाहन चालक गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

          प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.२) नोव्हेंबर २०२१ ला रात्री १०:३० ते ११:३० वाजता दरम्यान सुखलाल दादाराव पाटील वय ५२ वर्ष राह.संजीवनी नगर गहुहिवरा रोड कन्हान आपल्या बजाज सीटी १०० दुचाकी वाहन क्र.एम एच ३१ बी.वि ९८८१ नाग पुर बॉयपास महामार्गावरील गहुहिवरा उडाण पुलावर कामठी कडुन मनसर कडे जात असतांना आरोपी कंटेनर ट्रक क्र.एन एल ०१ एसी ३२४३ च्या चालकां नी आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन दुचाकी वाहना ला मागुन धडक मारल्याने दुचाकी वाहन चालकास डाव्या हाताला जबर दुखापत होऊन फॅक्चर झाल्याने व तोंडाला जबर मार लागल्याने दुचाकी वाहन चालक गंभीर जख्मी झाल्याने फिर्यादी सुंदरलाल पाटील यांच्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध अप क्र. ४१०/२०२१ कलम २७९, ३३७, ३३८ भादंवि १८४, १३४ अ ब मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून  कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल रामटेके व पोलीस शिपाई मंगेश ढबाले हे पुढील तपास करीत आहे.