Home Breaking News अपघातात युवकाचा जागीच मृत्यू ; सावनेर खापा मार्गावरील घटना.

अपघातात युवकाचा जागीच मृत्यू ; सावनेर खापा मार्गावरील घटना.

9

अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

सावनेर खापा मार्गावरील घटना.


सावनेर : सावनेर खापा मार्गावरील सावनेर येथे रेल्वे क्रॉसिंग जवळ चारचाकी व दुचाकी ची धडक झाल्याने सावनेर येथिल युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक नामदेव धनराज ढवळे राहणार सावनेर वय २८ वर्ष आपल्या मित्राला सोडण्यासाठी दुचाकी क्र MH 40AF 8910 ने कोदेगाव ला गेला होता. सोडून परत येतांना चारचाकी mh 40 AK 2925 ने जोरदार धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला.पुढील तपास सावनेर पोलीस ठाणेदार मारोती मुळुक यांच्या मार्गदर्शनात पीएस विजय पांडे करीत आहे