महोदय,
आपल्याला कल्पना आहेच की, चंद्रपूर येथून प्रकाशित होणारे दैनिक चंद्रधून, गेली अनेक वर्षे वृत्तपत्र, बातमीदारी व चंद्रपूरच्या पत्रकारिता जगतात स्वतःचे स्थान निर्माण करून सेवारत आहे. आपल्याला सूचित करण्यात अत्यंत आनंद होत आहे की, दैनिक चंद्रधून आता रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. या निमित्ताने यंदाच्या दिवाळीनिमित्त विविध माहिती व अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश असलेले दिवाळी अंक वाचकांसमोर सादर होईल.
आपली वैयक्तिक स्वरूपातील अथवा आपल्या ख्यातनाम व लोकप्रिय प्रतिष्ठानाची जाहिरात या पुरवणीसाठी देऊन आपण दैनिक चंद्रधूनच्या या उपक्रमास शुभेच्छा द्याव्यात, अशी विनंती आपणास या पत्राद्वारे करीत आहे.
सदर जाहिरात दरपत्रक सोबत जोडले आहे. नेहमीप्रमाणेच आपण या दैनिकासाठीच्या शुभेच्छा व आपल्या सद्भावना व्यक्त कराल अशी अपेक्षा आहे.
