Home चंद्रपूर महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी एड.कोमल हजारे नामांकर भरणार

महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी एड.कोमल हजारे नामांकर भरणार

12

*महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी एड.कोमल हजारे नामांकर भरणार*
चंद्रपूर दि.२३:- येत्या 24 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी चंद्रपूर येथील एड.कोमल दत्तात्रय हजारे या महिला राखीव गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या इतिहासात विदर्भातून पहिल्यांदाच महिला राखीव गटातून उमेदवारी अर्ज जाणार असल्याचे सर्वांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.राज्यात महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणुक अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाते.अनेक दिग्गज वकील या निवडणुकीत उतरतात.गेल्या काही वर्षात बार कौन्सिलच्या निवडणुकीत मोठा राजकीय हस्तक्षेप सुद्धा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदाच्या होणाऱ्या दुवार्षिक निवडणुकीकडे वकील मंडळी तसेच सर्व क्षेत्रातील लोकांचे लक्ष लागलेले आहे. चंद्रपुरातील नामांकित अधिवक्ता एड.दत्ता हजारे यांची कन्या एड.कोमल या महिला राखीव गटातून 25 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या इतिहासात विदर्भातून कोणत्याही महिला वकिलाने निवडणूक लढवलेली नाही.एड.राम हस्तक आणि एड.बाबा कारेकर यांनी पुरुष गटातून निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता.मात्र विदर्भातून पहिल्यांदाच एड. कोमल हजारे या महिला अधिवेक्ता निवडणूक लढविणार आहे.विदर्भात अधिवक्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.एड.कोमल हजारे यांचे वडील दत्ता हजारे हे चंद्रपूर चंद्रपूर तर त्यांचे बंधू एड.अनुज हे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली करतात. विदर्भातील वकिलाच्या वर्तुळात असलेले स्नेहबंध पाहता एड.कोमल हजारे यांची उमेदवारी अत्यंत प्रतिष्ठित राहील अशी चर्चा अभिवक्तांच्या वर्तुळात आहे.एड.कोमल हजारे यांनी गुन्हेगारी,आणि दंडशास्त्रात एलएलएम केले आहे.तसेच एलएलबी मध्ये सुवर्णपदक विजेत्या ठरल्या होत्या. गेल्या १५ वर्षापासून त्या चंद्रपुरात वकील करीत आहे.